Breaking News

*गोंदिया शहरातील अनेक युवकांचा मनसे पक्षात प्रवेश*

*गोंदिया शहरातील अनेक युवकांचा मनसे पक्षात प्रवेश*

गोंदिया – दिनांक १७ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावराटोली वार्डातील अनेक युवकांनी मनसे अध्यक्ष मराठीह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश घेतला. पक्षाविषयी तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. व येणाऱ्या आगामी नप निवडणुकी करिता पक्षाची जोमात बांधणी सुरू आहे, गोंदियातील प्रत्येक वार्डात शाखा राबविण्यात आलेली आहे. याचे फळ नक्कीच मिळेल प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने सामान्य माणसाचा न्याय हक्कासाठी लढा व आपले कार्य सर्वं जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य यांनी केले. या वेळी गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे शहर उपाध्यक्ष रजत बागडे मरारटोली शाखा अध्यक्ष सुमित कावळे, तसेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये संस्कार लदरे, राज बिरिया, हेमांशु विरहा, सौरभ शेंद्रे, अनिकेत सांडेकर, सोनु लदरे, विवेक डकाह, निखिल बैरीसाल व इतर महाराष्ट्र सैनिकांचा समावेश होता.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …