Breaking News

*वडविहीरा व काटोल येथील वडिलोपार्जित निवासस्थानी ईडी पथका मार्फत झाडाझडती* *ईडी च्या कार्यवाही चा निषेध*

*वडविहीरा व काटोल येथील वडिलोपार्जित निवासस्थानी ईडी पथका मार्फत झाडाझडती*

 

*ईडी च्या कार्यवाही चा निषेध*

काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी
काटोल – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानावर दोनदा तपासणी केल्यावर नागपूर जिल्हातील
नरखेड तहसीलच्या मुळ गावी वडविहीरा येथे रविवारी,18 जुलै रोजी सकाळी सात वाजता वडिलोपार्जित मूळ निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले व घराची तपासणी सुरू केली व वडविहीरा येथील शेती व घराची पाहणी करणारे पंकज देशमुख यांना काटोल येथे घेऊन आले. वडविहीरा सोबतच काटोल येथील घरी सुध्दा सकाळी सात वाजता पासून झाडाझडती सुरू होतीच, या दरम्यान वडविहीरा येथील ई डी चे पथक सकाळी 10.30 वाजता,पंकज देशमुख सह काटोल यांच्या निवासस्थानी पोहचले.येथे तपासणी आधीपासूनच तपासणी सुरुच होती. सकाळी सात वाजल्यापासून काटोल निवासस्थानावर ईडीच्या छाप्याची माहिती काटोल व ग्रामीण भागात वार्यासारखी पसरल्याची माहिती पसरली, तेव्हा शहर व ग्रामीण भागातील शेकडो महिला व पुरुष, कामगार, अनिल देशमुख देशमुख यांच्या काटोल निवासस्थानासमोर जमले. काळ्या रंगाचा फिती बांधून अनील देशमुख यांच्या समर्थनार्थ आणि ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत


*भर पावसात ही नारेबाजी सुरूच*
दरम्यान, दुपारी बारा वाजता काटोलात पावसाच्या सरी बरसल्या, पाऊस सुरू असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर अनील देशमुख यांचे समर्थनार्थ व ई डी चे विरोधात घोषणाबाजी करत होते. *अनिलबाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है।परमवीरसिंह यांना अटक करा*,


*ईडी च्या कार्यवाही चा निषेध असो*
भर पावसात या घोषणा देत होते. काटोल व ग्रामीण भागातील शेकडो महिला पुरूष उपस्थित होते, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव व वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेवराव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ईडीचा तपास रवीवार 18 जुलै रोजी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होता. दुपारी 1.30 नंतर ईड मिळालेल्या माहितीनुसार वडविहीरा आणि काटोल येथील 10-15 वर्ष जुन्या कागदपत्रांची पाहणी व तपासणी केली गेली पण इकडे काहीही सापडले नाही अशी माहिती मिळाली आहे, काटोल निवास स्थानी शब्बीर शेख, मुन्ना पटेल व गणेश चन्ने यांचे समक्ष काटोल येथे ईडीने केलेल्या कार्यवाही चे पंचनामा केला.अशी माहिती मिळाली आहे. या नंतर ई डी चे तपासणी पथक नागपूरला रवाना झाले!

अशी माहिती आहे की काटोल वडविहीरा येथून कोणताही कागदपत्र सापडला नाही, अशी माहिती आहे. ईडीची तपासणी पथक नागपुरात परत गेल्यानंतरही शेकडो कार्यकर्ते अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणा देत राहिले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …