*क्रिडा पटांगणास येणार सुगीचे दिवस*
*मा.पशुसंवर्धन दुग्धविकास,क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदारांच्या प्रयत्नास यश*
*लवकरच सर्व सुविधायुक्त क्रिडा पटांगण उपलब्ध होणार असल्याने खेळाडू व क्रिडाप्रेमीत उत्साहाचे वातावरण*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर – राज्यशासनाने क्रिडा संकुलाचा विषय मार्गी काढत तालुका क्रिडा विभाग व नगर पालीका सावनेर यांना व्यवस्थापन खर्चा करीता क्रिडा संकुल परिसरात व्यवसाईक गाळे निर्माण तसेच 60-40 नुसार हिस्सेदारी निश्चित*
*सावनेर शहराच्या मध्यभागी असलेल्या पटांगणास तालुका क्रिडा विभागास हस्तांतरित करुण बँडमिंटन,कबड्डी,तायकांडो,स्केटिंग,बुध्दीबळ,कँरम सारखे इनडोअर खेळांना चालना मीळावी याकरीता क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सदर क्रिडा संकुल निर्माण करण्याकरिता कोटीचा निधी मंजुर करवून घेतला परंतू नगर प्रशासन व क्रिडा विभागाच्या गाळे वाटपाच्या आपसी आट्यापाट्यामुळे सदर क्रिडा संकुल निर्माण होण्यासाठी अनेक अडथडे सोबतच शहरातील क्रिडाप्रेमी,पालकवर्ग व समाजसेवींनी अनेक आंदोलने करुण शहरातच नव्हे ते तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याकरिता उपयुक्त ग्राऊंड असावे असा हट्ट धरला होता सदर विषयावर क्षेत्राचे नेते सुनील बाबू केदार यांनी मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सदर विषय निकाली काढत शहरवासीयांना तसेच क्रिडाप्रेमींना हक्काचे क्रिडांगण उपलब्ध करुण दिल्याने क्रिडाप्रेमीत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असुन दिलेल्या शब्दाला जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ना.सुनील बाबू केदार यांच्याकडे बघितलं जाते*
Maharashtra News Media सच की आवाज