*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन, नागपूर तर्फे शांती भवन वृद्धाश्रम, नागपूर येथे जेष्ठ नागरिकांना मोफत कपड्यांचे वाटप*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- उमंग कला निकेतन संस्थे अंतर्गत चालणाऱ्या उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा, नागपूर या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व रोट्रॅक्ट विभागा मार्फत राजनगर, नागपूर येथील मिशनरी ऑफ चॅरिटी मदर टेरिसा (शांती भवन) येथे आज दिनांक १६-७-२०२१ रोजी कपड्यांचे वाटप करण्यात आले. वृद्धत्व म्हणजे जणू दुसरे बालपणच ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे या सद्हेतूने या संस्थेची स्थापना झाली. कॉलेजच्या संचालिका श्रीमती वैशाली फुले यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. आपल्या भारत देशात आई-वडिलांना देवासारखे समजले जाते. तिथे अशा प्रकारची वागणूक बघून मन अस्वस्थ होते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा व ज्यांनी मुलांच्या सुखाकरिता आपले पूर्ण आयुष्य घालवले त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि त्यामुळे त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देऊ नये.
कार्यक्रमादरम्यान कपड्यांचे वाटप करताना सोशल डिस्टनसिग चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ह्या वेळेस शांती भवन चे प्रभारी सिस्टर जुडीशा एम. सी. व त्यांचे सहकर्मचारी आणि महाविद्यालयाच्या संचालिका श्रीमती वैशाली फुले, प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे, कार्यक्रम अधिकारी श्री. निलेश मेश्राम, कु. पलक फुले, कु. साक्षी फुले, उमंग गीताई कॉलेज मार्केटिंग विभाग प्रमुख श्री. तेजस फुले, प्रा. रश्मी उईके, प्रा. जान्हवी नंदनवार, रोट्रॅक्ट अध्यक्ष कु. भारती भैसारे, रासेयो विद्यार्थी प्रमुख कु. जान्हवी यादव, न्यूट्रिशन एन्ड डायटेटिक्स भाग-२, गीता कुंभारे फॅशन एन्ड अँपेरल डिजाइन भाग ३ व भाग २ ची विद्यार्थिनी योजना जाणे, सौ. दर्शना बिहाडे आणि श्री मधुकरजी डांगे उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज