Breaking News

*इंटक चे महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष मंगेश डांगे यांचा भाजपात प्रवेश*

*ब्रेकिंग न्यूज*


*इंटक चे महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष मंगेश डांगे यांचा भाजपात प्रवेश*

आवारपूर प्रतिनिधि :-गौतम धोटे  

इंटक चे महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष मंगेश डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत मंगेश डांगे यांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचा दुपट्टा गळयात घालुन मंगेश डांगे यांचे स्‍वागत केले व पक्ष प्रवेशाबाबत शुभेच्‍छा दिल्‍या.
भारतीय जनता पार्टीच्‍या ध्‍येय, धोरणांनी प्रभावित होवून तसेच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विकासाभिमुख कार्यशैली यामुळे प्रभावित होवून आपण भाजपात प्रवेश घेतला असून यापुढे भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबुत करण्‍यासाठी आपण परिश्रम घेवू असे श्री. डांगे यांनी म्‍हटले आहे. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …