Breaking News

*”बाघ सखा” चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरण*

*”बाघ सखा” चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरण*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- दिनांक 19 जुलै 2021 सोमवार रोजी मध्य प्रदेश टायगर फाउंडेशन व WWF-INDIA यांच्या संयुक्त सहभागाने वन्य प्राणी, पशु, पक्षी, जंगल क्षेत्र, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व सुरक्षा अबाधित राहण्याच्या हेतूने ‘बाघ सखा ‘ चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वनविभागाला वनक्षेत्राचे संरक्षण करताना येणाऱ्या अडचणी जशा की जंगल कटाई,अवैध शिकार, मानव- वन्यजीव संघर्ष प्राण्यांची तस्करी यांचा सामना करण्यासाठी व्यापक स्वरूपाची जनजागृती, निसर्गाबद्दल आवड उत्पन्न करणे व जंगल वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना ,मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी लोकसहभाग वाढविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. दि. 11/ 7 /2021 रोजी टी -शर्ट हे स्पर्धकांना वितरित करण्यात आले तर दि. 14/ 7 /2021 रोजी स्पर्धकांनी कडून टी-शर्ट संकलित करण्यात आले. ह्या टी-शर्टवर मध्य प्रदेशातील जंगलात आढळणारे पशु,पक्षी यांचे चित्र रेखाटण्याचे आवाहन केले होते. ही स्पर्धा खुला गट व विद्यार्थ्यांसाठी अशा दोन गटा साठी घेण्यात आली. एकूण 72 स्पर्धकांनी आपला प्रतिसाद नोंदविला. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. सुनील लिमये यांनी अध्यक्ष पद भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सदानंद चौधरी प्राध्यापक चित्रकला महाविद्यालय नागपुर, श्री संजय करकरे बी एन एच एस, श्रीमती स्नेहल पाटील विभागीय वन अधिकारी, श्रीमती प्रियंका बरगे सहाय्यक वनसंरक्षक नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते तर WWF-INDIA चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी व मानद वन्यजीव रक्षक श्री अजिंक्य भटकर यांनी कार्यभार सांभाळला. खुल्या गटात प्रथम क्रमांक श्रीमती.स्वाती तुपकरी , द्वितीय क्रमांक श्रीमती अश्विनी आडे, तृतीय क्रमांक सौ. तेजस टेकाडे व श्री दिनेश शिरसाट तर उत्तेजनार्थ पुरस्कार अथर्व साल्पेकर व शशीन भोयर यांना विभागून देण्यात आले. तर विशेष उल्लेखनीय पुरस्काराने निलेश तुपकरी यांना गौरवान्वित करण्यात आले दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या गटात प्रथम क्रमांक कु.गायत्री वळसकर, द्वितीय क्रमांक निर्भय कुंभारे व कु. प्रीती भौमिक यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक हा साकेत सोरते व कु अक्षिता शिरसाट यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार कु.लक्षिता कजवाडकर, कु.जान्हवि धुमने, कु.सुरभी अलोनी व अद्वैत साल्पेकर यांना देण्यात आला .विशेष उल्लेखनीय पुरस्काराची मानकरी कुमारी हर्षिता हेलीवाल ठरली. प्रमुख अतिथी डॉ.सदानंद चौधरी यांनी या प्रसंगी कलावंत व निसर्ग यांचे नाते स्पष्ट करून चित्रांच्या सहाय्याने निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कळकळीचे आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात मान. श्री.सुनील लिमये यांनी विद्यार्थ्यांना वाघ व जंगल यांचे नाते स्पष्ट करून जंगलात प्रत्यक्ष भेट द्यावी व प्रत्येक नागरिकाचे वनसूरक्षेबाबतचे कर्तव्य यासाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर श्री अजिंक्य भटकर यांनी ह्या स्पर्धेद्वारे अपेक्षित हेतू सफल झाल्याचे समाधान व्यक्त करून आपण सर्वांनी आपल्या स्तरावर निसर्ग संवर्धनाचे कार्य करावे असे आव्हान केले. या स्पर्धेसाठी श्री आशिष कोहळे, नजीवन चौधरी, सौ. पूजा भटकर, श्री.आनंद भंडारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …