Breaking News

*घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याच्या मागणी करिता प्रहार चे आमरण उपोषण सुरु*

*घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याच्या मागणी करिता प्रहार चे आमरण उपोषण सुरु*

कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी :- एन एम आर डी (NMRDA) अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना केंन्द्र सरकारचा अडकलेला निधी तात्काळ उपलब्ध करून
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याचा मागणी करीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरन उपोषण सुरु करण्यात आले .


कामठी – मौदा विधानसभेतील हजारो लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले असुन सदर आदेशानुसार लाभार्थ्यांनी जुनी घरे पाडुन घराचे बांधकाम सुरु केले व तात्पपुरते वास्तव्य कुळामातीचे घरात सुरु केले असुन पावसाळा सुरु झाल्याने साप , विंचु घरामध्ये शिरत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे . अनेकांनी व्याजाचे पैसे घेऊन बांधकाम केले असुन त्यांच्या थकलेला निधि तात्काळ आठ दिवसाच्या आत उपलब्ध करुन देण्याचा मागणी करीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वडोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने , उप तालुका प्रमुख श्रीकांत ठाकरे , वाहण चालक संघटना तालुका प्रमुख सोनु कानफाडे यांनी आमरन उपोषण सुरु केले आहे .
या आमरन उपोषणाला तालुका प्रमुख पंकज ढोरे , सोशल मीडिया प्रमुख कार्तिक भिसेकर , नान्हा मांगली येथील माजी सरपंच सुधाकर करडभाजने , वृषभ अटारकर , शुभम धावळे , रमेश पारधी , किरण महाकाळकर , गणेश करडभाजने , दिलीप चौधरी , यांनी समर्थन केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …