Breaking News

*तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश*

*तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश*

 

वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे

आर्वी :- तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी युवक काँग्रेस आर्वी विधानसभा अध्यक्ष वृषभ निस्ताने यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला ,, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजाच्या ,राज्याच्या विकासाला महत्त्व देणारा पक्ष आहे ,म्हणून या पक्षाने राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे आधारवड शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार व येणाऱ्या काळासाठी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार आहे ,होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार असे प्रयत्न करू असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. प्रतिनिधी सोबत बोलताना वृषभ निस्ताने यांनी आपले मत मांडले. प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असून येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादी मय करण्याच्या दिशेने व युवकांच्या विकासासाठी जोमाने काम करणार असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आर्वी शहराध्यक्ष रत्नदीप मोटघरे यांनी व्यक्त केले.रा.यु.का.विधानसभा सचिव सुमित बीजवे यांनी पक्षात येणाऱ्यांचे सहर्ष स्वागत केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहर उपाध्यक्ष पदी करन मेघवानि,शहर सचिव पदी रोशन कठाने,शहर कोषाध्यक्ष पदी सचिन नेताम, यांची निवड करण्यात आली.

यावेळी – सागर हेडाऊ,रत्नाकर डांगे, गोपाल चौधरी, प्रथम बोरखडे,राज कावरे, शैलेश मडामे,आदित्य राऊत,चेतन राठोड,नितीन राऊत,समीर राऊत,विकी गवई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …