Breaking News

*जेवनावरून वादविवाद करून शांती सोलंकी च्या डोक्यावर मारून केले जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*जेवनावरून वादविवाद करून शांती सोलंकी च्या डोक्यावर मारून केले जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट अम्मा दर्गा येथे पंकज सोलंकीने जेवनावरून वादविवाद करून शांती सोलंकी च्या डोक्यावर लाकडी दंडयाने मारून जख्मी केल्याने शांती सोलंकी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पंकज सोलंकी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१७ जुलै २०२१ ला ७:३० ते ८:०० वाजता दरम्यान शांती नथुलाल सोलंकी वय २७ वर्ष राहणार गाडेघाट अम्मा दर्गा हिला पंकज नथुलाल सोलंकी वय ३० वर्ष राहणार गाडेघाट अम्मा दर्गा याने जेवनासाठी भाजी मांगितली असता शांती सोलंकी ने पंकज नथुलाल सोलंकी याला थोड्यावेळ थांब असे सांगुण जेवनासाठी भाजी व पोळी आपली आई व मोठा भाऊ यांना अगोदर दिल्याने पंकज नथुलाल सोलंकी ने शांती नथुलाल सोलंकी सोबत वादविवाद करून शिवीगाळ केली व लाखडी दंड्याने मारून गंभीर जख्मी करण्याचा उद्देशाने शांती सोलंकी च्या डोक्यावर मारून जख्मी केले. असे फिर्यादी शांती नथुलाल सोलंकी च्या मृत्युपुर्व तक्रारी वरून व वैद्यकीय अधिकारी यांच्या अभिप्राया वरून कन्हान पोलीसानी पंकज नथुलाल सोलंकी यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक. २६८ /२०२१ कलम ३२६ , ५०४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …