Breaking News

*कांन्द्री येथे पती ने पत्नीला चाकु ने मारहाण करून केले जख्मी* *कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

*कांन्द्री येथे पती ने पत्नीला चाकु ने मारहाण करून केले जख्मी*

*कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनगर कान्द्री येथे आपल्या पत्नी ला भाजीपाला कापण्याचा चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी पत्नीच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पती राजु मुचुडे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार राजु परदेशी मुचुडे वय ३८ वर्ष राहणार शिवनगर कांन्द्री – कन्हान हा निकिता राजु मुचुडे वय ३० वर्ष हिचा पती असुन दारू पिण्याचा सवयीचा असल्याने व नेहमी शक लावुन झगडा भांडण करीत असतो त्यामुळे निकिता मुचुडे ही १५ दिवसा पासुन तिचा आई कडे खदान नंबर ४ येथे राहत आहे. शनिवार दिनांक.१७ जुलै २०२१ ला सायंकाळी ४:०० ते ४: ३० वाजता दरम्यान निकिता मुचुडे ही भांडे धुण्याचे काम करून घरी परत येत असता पती राजु परदेशी मुचुडे याने पत्नी निकिता राजु मुचुडे हिला म्हटले कि तु तुझ्या आई कडे का राहते, घरी का येत नाही. असे म्हणुन शिवीगाळ करून भाजीपाला कापण्याचा चाकु ने पत्नी निकिता मुचुडे च्या दोन्ही हाताच्या मनघटा जवळ व मानेला मारून जख्मी केले. असे फिर्यादी पत्नी च्या तक्रारी वरुन व मेडिकल रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी पती राजु परदेशी मुचुडे विरुद्ध अपराध क्रमांक २६७/२०२१ कलम ३२४, ५०४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार सहारे हे करीत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …