Breaking News

*समाजाकडुन पाठिवर कौतुकाची थाप* *सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व्दारे धर्मराज शाळे तील कोविड निराश्रित विद्यार्थी दत्तक योजनेचे कौतुक*

*समाजाकडुन पाठिवर कौतुकाची थाप*

*सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व्दारे धर्मराज शाळे तील कोविड निराश्रित विद्यार्थी दत्तक योजनेचे कौतुक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेत माणुस कीचा परिचय देत कोव्हिड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील निराश्रित बालकांना शैक्षणिक दत्तक घेण्यात येत आहे. या दत्तक योजनेचे कौतुक दिनांक.१३ जुलै २०२१ ला समाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी केले. यावेळी प्रशांत बाजीराव मसार व योगशिक्षक मिलिंद मेश्राम यांनी निराश्रित दत्तक योजनेचे प्रमुख श्री भिमराव शिंदे मेश्राम व श्री खिमेश बढिये यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या निराश्रित दत्तक योजने अंतर्गत धर्मराज प्राथमिक शाळेत आतापर्यंत यश देवेंद्र शेंदरे (कांन्द्री) व सार्थक शिवशक्ती सोनबरसे (नवीन गोंडेगाव) या विद्यार्थ्यांला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देऊन शाळे तर्फे दत्तक घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांला प्राथमिकचे पूर्ण शिक्षण, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती योजने चा लाभ व इतर बाबीत शाळेकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे या मोहिमेचे प्रमुख श्री भिमराव शिंदे मेश्राम यांनी सांगितले. या सत्कार कार्यक्रमात मुख्याध्यापक आशा हटवार, दत्तक पालक योजने चे प्रमुख श्री खिमेश बढिये, श्री भिमराव शिंदे मेश्राम, सौ चित्रलेखा भोयर, श्री अमित मेंघरे, सौ प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी सह आदि शिक्षकगण उपस्थित होते. योजने अंतर्गत निराश्रित बालकांनी लाभ घ्यावा, तसेच कोव्हिड १९ अंतर्गत शासकीय योजना व मदतीसाठी समाजिक कार्यकर्ता श्री प्रशांत बाजीराव मसार पिपरी – कन्हान यांच्याशी 9595553381, 9518322567 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी केले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …