*कांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी*
कन्हान प्रतिनिधि – रुषभ बावनकर
कन्हान : – कांन्द्री परिसरात आषाढी एकादशी निमित्य शहरात विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरा मध्ये श्री हरी विठ्ठलाची विधवित पुजा अर्चना, भजन किर्तन करून प्रसाद वितरण करित आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
मंगळवार दिनांक.२० जुलै २०२१ ला आषाढी एकादशी निमित्य श्री हनुमान मंदिर खदान रोड कांन्द्री येथे विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात श्री हरी विठ्ठलाची विधवित पुजा अर्चना करून नवदुर्गा महिला भजन मंडळ, दत्त नगर कांन्द्री यांनी भजन कीर्तन सादर केले असुन या कार्यक्रमात सुनिता हिवरकर, बेबी साखरे, उषा वंजारी, विमल आकरे, इंदु टेंभरे, शोभा फुकटकर, शालु उमाळे, मधुकर खडसे, प्रेमराज आकरे, मधुकर कांबळे, विक्रम वांढरे, अशोक किरपान, सुरेश उमक सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्विते करिता वामन देशमुख, कवडु आकरे, राया हिवरकर, वासुदेव आकरे, लता दिदी, उषा वाडीभस्मे, मंगला कांबळे सह ग्रामस्थानी सहकार्य केले.