Breaking News

*प्रहार पदाधिकार्यांच्या एका तासाच्या ठिय्या आंदोलनात मागणी पुर्ण* *तालुका आरोग्य अधिकारी श्री माने यांनी रुग्णांचा रक्त नमुना घेऊन नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्याची केली सुरवात*

*प्रहार पदाधिकार्यांच्या एका तासाच्या ठिय्या आंदोलनात मागणी पुर्ण*

*तालुका आरोग्य अधिकारी श्री माने यांनी रुग्णांचा रक्त नमुना घेऊन नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्याची केली सुरवात*

कन्हान / कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी तालुक्यात सर्वत्र डेंग्यू, टायफॉइड ची साथ सुरू असतांना प्राथमिक आरोग्य केंन्द्र गुमथळा व भुगाव येथे डेंग्यू, टायफॉइड ची तपासणी होत नसल्याने गरीब नागरिकांन करिता व रुग्णासाठी तात्काळ तपासणी केंन्द्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष कामठी – मौदा विधानसभेच्या वतीने गुमथळा प्राथमिक आरोग्य केंन्द्रा समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते . परंतु तालुका आरोग्य अधिकारी श्री माने यांनी एका तासा नंतर प्रहार च्या ठिय्या आंदोलनात पोहचुन त्यांचे सर्व मागण्या पुर्ण करुन तात्काळ डेंगु व टायफाॅड ची रक्त नमुना घेऊन नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्याची सुरवात केल्याने प्रहार जनशक्ति पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले .


गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१ ला कामठी – मौदा विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने हे स्वतःआजारी असतांना तपासणी करण्या करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे गेले असता त्यांना डेंगू व टायफाॅइड ची तपासणी होत नसल्याचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी श्री. माने यांचेशी फोन करून संवाद साधला असतांना त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने विधानसभा प्रमुख छत्रपाल करडभाजने यांनी आपल्या जीवाची परवाह न करता नागरिकांच्या हितार्थ प्रहार जनशाक्ति संगठन च्या पदाधिकार्यांना सोबत घेऊन गुमथळा प्राथमिक आरोग्य केंन्द्रा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते व जो पर्यंत डेंग्यू व टायफॉइड ची तपासणी गुमथळा व भुगाव आरोग्य केंन्द्रात सुरू करण्यात येणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहिलं असे ठाम पणे छत्रपाल करडभाजने यांनी सांगितले होते . परंतु तालुका आरोग्य अधिकारी श्री माने यांनी एका तासा नंतर प्रहार च्या ठिय्या आंदोलनात पोहचुन सर्व मागण्या पुर्ण करुन तात्काळ डेंगु व टायफाॅड ची रक्त नमुना घेऊन नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्याची सुरवात केल्याने प्रहार जनशक्ति पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले .

या प्रसंगी तालुका प्रमुख पंकज ढोरे , वाहण चालक तालुका प्रमुख सोनु कानफाडे , अपंग क्रांती तालुका प्रमुख श्रावण वाघ , उप तालुका प्रमुख श्रीकांत ठाकरे , सोशल मीडिया प्रमुख कार्तिक भिसेकर , आनंद टेकाम, जिवन राऊत, शुभम धावळे, गणेश करडभाजने , अरूण गजभिये, महेंद्र घोडमारे, सुरज मलोडे, शुभम शेंडे, युवराज बसेशंकर, राहुल डाफ,सतिश कुकडे, रोहित टेंभेकर सह आदि प्रहार चे पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …