Breaking News

*बखारी येथे महिला शेतीशाळा वर्ग संपन्न*

*बखारी येथे महिला शेतीशाळा वर्ग संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कृषी विभागा व्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बखारी गावात महिला शेतीशाळा वर्ग घेऊन शेती विषय मार्गदर्शन करण्यात आले.


बुधवार ला मौजा बखारी तालुका पारशिवनी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत महिला शेतीशाळेचा ३ रा वर्ग घेण्यात आला. सदर शेतीशाळा वर्गात पावसाचा खंड पडल्यास धान तसेच इतर पिकांच्या रोपांची घ्यावयाची काळजी, धान पीक लागवडीसाठी श्री पध्दत तसेच पट्टा पद्धतीचा अवलंब करणे, धान पिकातील खोड किडा व्यवस्थापन व त्यासाठी नर्सरीच्या ठिकाणी कामगंध सापळ्याचा वापर, कामगंध सापळा शास्त्रक्त पध्दतीने कसा लावायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या वेळी धान व इतर पिकांमध्ये जमीन आरोग्य पत्रिका निर्देशांक नुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर त्यासाठी कृषक अँप चा वापर कसा करणे तसेच सेंद्रिय निविष्ठा वापर करून जमिनीचा पोत सुधारणे इत्यादी विषयांवर महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी मासिक वाटप व सांघिक खेळ घेण्यात आला. शेवटी अल्पोपहार करून शेती शाळेचा समारोप करण्यात आला. सदर शेती शाळेसाठी ग्राम पंचायत सरपंच श्री नरेश ढोणे, गावा तील २५ महिला शेतकरी, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री जी बी वाघ, कृषी सेवक बखारी कु.पी.एम.गटकाळ, श्री के.बी.ठोंबरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …