Breaking News

*कन्हान येथे भाजपा व शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिदांना दिली श्रद्धांजलि*

*कन्हान येथे भाजपा व शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिदांना दिली श्रद्धांजलि*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे कारगिल विजय दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर व कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारका वर पुष्प हार माल्यार्पण करुन व कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करित युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .

*भाजपा कन्हान शहर*

भाजपा कन्हान शहर द्वारे कारगिल विजय दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा शहिद चौक येथे करण्यात आले असुन भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते शहिद स्मारका वर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित पदाधिकार्यांनी पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला .या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , जेष्ठ नेते रामभाऊ दिवटे , श्रवण वतेकर , महामंत्री सुनील लाडेकर , महामंत्री अमोल साकोरे , कामेश्वर शर्मा , रिंकेश चवरे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर ,अनिता पाटील , वंदना कुरडकर , लक्ष्मी लाडेकर , तुलेशा नानवटकर , सुषमा मस्के , मनोज कुरडकर , अजय लोंढे , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , दिपनकर गजभिए , मयूर माटे , सचिन वासनिक , अमन घोडेस्वार , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

*कन्हान शहर विकास मंच*

कन्हान शहर विकास मंच च्या द्वारे कारगिल विजय दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करुन मंच उपाध्यक्ष संजय रंगारी यांच्या उपस्थिती मध्ये शहिद स्मारका वर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन युद्धांत शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष संजय रंगारी , सचिव प्रदीप बावने , हरीओम प्रकाश नारायण , रुषभ बावनकर , प्रकाश कुर्वे , सोनु खोब्रागडे , सुषमा मस्के , वैशाली खंडार , अखिलेश मेश्राम , चिंटु वाकुडकर , मयुर माटे , सचिन वासनिक सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …