*हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काढण्यात आला आक्रोश मोर्चा*
हिंगणघाट प्रतिनीधी -भाऊराव कोटकर
हिंगणघाट – पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करण्याबाबत तसेच ०२ ऑगस्ट २०१९ ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात दिनांक २८ जुलै २०२१ रोज बुधवारला हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध व्यक्त करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा संत तुकडोजी चौकापासून, कारंजा चौक, इंदिरा गांधी चौक ,गोल बाजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक होत,तहसील कार्यालयावर धडकला व निषेध प्रदर्शन करत पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ तसेच ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्या.
अशा मोठमोठ्याने घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये विशेष आकर्षित तीन चाकी रिक्षा वर मोटर सायकल ,गॅस सिलेंडर व तेलाचा पिपा ठेवून त्यांना पुष्पहार घालून मोर्चा काढण्यात आली तसेच घोड्याच्या सुद्धा सहभाग होता.
मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून सर्व देश वासी यामुळे आर्थिकदृष्ट्या भरून निघाले आहेत. अशातच केंद्र सरकार द्वारे वेळोवेळी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ ही देशवासियांसाठी व शेतकरी यांच्यासाठी मोठी अन्यायकारक आहे.सध्या शेतकरी,शेतमजूर ,कामगार, व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य लोकांचे अर्थचक्र पूर्णपणे बंद झालेले असून नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्यासमोर उपजीविकेसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. अशातच पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
मोर्च्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने युवकांनी व सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेतला.