*गुरूपौर्णिमा कांद्री ला गुरूपुजन कार्यक्रमाने साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – ग्रामिण भागातील लोक कलावंताची आपल्या गुरू विषयी असलेली अपार श्रध्दा आणि पारंपारिक लोककला जोपसण्या करिता गुरूपौर्णिमा च्या दिवशी हनुमान मंदीर कार्यालय कांन्द्री येथे गुरू वर्याचे पुजन व लोककला सादर करून गुरूपौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे गुरूपौर्णिमे ला गुरूवर्याचे पुजन कार्यक्रम कोव्हिड-१९ नियमा अंतर्गत श्री. हनुमान मंदिर कार्यालय कांन्द्री येथे वस्ताद खंडुजी कृपेने लोक शाहीर स्व.भीमराव बावणकुळे गुरूजी यांचा प्रित्यर्थ गुरूपुजन कार्यक्रमाची सुरूवात सर्वप्रथम श्री चे पुजन व हनुमान मुर्ती पुजन प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर वांढरे विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परीषद पुणे, राजेंन्द्र बावनकुळे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परीषद नागपुर, योगेश वाडीभस्मे, शिवाजी चकोले, प्रकाश चाफले, फजित बावणे आदीच्या हस्ते करून शाहीर विक्रम वांढरे, शिवशक्ती डहाका मंडळ कांन्द्री तसेच बाहेर गावातील आलेले शाहीर मान्यवरांच्या डहाका मंडळ व्दारे गीत गायन करण्यात आले. या प्रसंगी शाहीर विजय चकोले, दशरथ भंग, रवि दुपारे, हुकुम ठाकरे, मोतीराम चौधरी, बाळा बावणे, शिवा लक्षणे, सोपान उपरकर, मधुकर कामडे, दशरथ कुंडे आदी ने प्रामुख्याने सहभागी झाले होते. गुरूपुजन कार्यक्रमाचे स्वागत-सभारंभ व आभार प्रदर्शन वामन देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजक शाहीर विक्रम वांढरे, भोजराज घरजाडे, शालीकराम शेंडे, गिरधर बावणे, निलेश वांढरे, भुपेश बावणकुळे, प्रफुल्ल भन्नारे, जितेन्द्र अतकरे, राजेन्द्र लक्षणे, महादेव पारसे, मोंटु दादा व सेवकराम नेवारे आदीने यशस्वीते करिता परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज