Breaking News

*सायबर क्राईम महिलांनी जागरुक राहण्याची आवश्यकता – पोलीस निरीक्षक विजय मालचे* *नवी कामठी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजन*

*सायबर क्राईम महिलांनी जागरुक राहण्याची आवश्यकता – पोलीस निरीक्षक विजय मालचे*

*नवी कामठी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – सायबर गुन्हेगार महिलांना लक्ष्य करीत असून मोबाईल हाताळतांना महिलांनी अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय मालचे यांनी केले .

पोलिस आयुक्तालय नागपुर शहर अंतर्गत नवी कामठी पोलिस स्टेशन येथील महिला दक्षता समिती ची बैठक बुधवार ला दुपारी आयोजित करण्यात आली असुन या बैठकी मध्ये महिलांना मार्गदर्शन करतांना सायबर गुन्हेगारा पासुन जागरुक राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विजय मालचे यांनी केले असुन फेक लिंक , लॉटरी , अनोळखी कॉल पासून सावध राहून बँक डिटेल्स, ओटीपी कुणाशीही शेअर करू नका व एखादी व्यक्ती फोनवर असे डिटेल्स मागितल्यास पोलिस विभागाशी सपंर्क करा असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय मालचे यांनी केले आहे .
पोलिस उपनिरीक्षक गिता रासकर यांनी महिला अत्याचार,सायबर क्राइम,फसवणूक, घरेलू हिंसा
बद्दल मार्गदर्शन केले .
यावेळी नगरसेविका संध्या रायबोले , नगरसेविका सावला सिंगाडे , वंदना पुरोहित , निशा मेश्राम , विद्या बोंबले , राणी कांबळे , जया मेश्राम , विशाखा गेडाम , विभा नितनवरे , प्रिति कुल्लरकर सह आदि महिला उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …