*गट ग्राम पंचायत वराडा अंतर्गत गावात नियमित विद्युत पुरवठा देण्याची मागणी*

*ग्रामिण मध्ये विधृत पुरवठा व्यवस्थित न कर ता ग्राहकांना न सांगता विद्युत लाईन कापतात*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महावितरण कंपनी व्दारे कन्हान ग्रामिण भागातील गावामध्ये नियमित विद्युत पुरवठा तर करित नाही परंतु बिल मात्र तेवढेच पाठवित आहे. कोरोना काळाने बिल थकीत असल्याने थोडे थोडे करून नागरिक विद्युत बिल भरत आहे. परंतु महावितरण वसुली पथक फिरून नागरिक घरी नसतांना, कुठलिही सुचना किंवा विचारणा न करता विद्युत लाईन कापुन विद्युत पुरवठा खंडीत करित असल्याने महावितरणा विरूध्द नागरिकांन मध्ये रोष भडकत आहे.
बुधवार दिनांक .१४ जुलै ला वराडा गावात महावितरण कंपनी चे कन्हान ग्रामिण अभियंता गवते हे स्वत: वसुली पथकासह वराडा गावात विद्युत बिलाच्या वसुली करिता फिरले. शेती कामाचे महत्वाचे दिवस असल्याने नागरिक शेतामध्ये गेले असल्याने घरी कुणीही नसताना, बिल भरण्याचे न विचारता तसेच कुठलिही सुचना न देता थकीत विद्युत ग्राहक नागरिकांचे विद्युत लाईन कापुन बंद करण्यात आली. गट ग्राम पंचायत वराडा येथे ११ ते २ वाजे पर्यंत शाळा सुरू करण्या विषयी बैठकीत शाळा मुख्याध्यापक, केंन्द्र प्रमुख,आरोग्य कर्मचारी, सरपंचा सचिव व नागरिक यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यानंतर ३ वाजे पर्यंत सरपंचा सौ विद्याताई चिखले व सचिव भगत उपस्थित होते. तेव्हा पर्यंत विद्युत वसुली पथकांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत पंचायत मध्ये न येता नागरिकांची घरघुती लाईन व ग्राम पंचायतची लाईन कापण्याविषयी कुठलिही सुचना न देता विद्युत लाईन कापुन विधृत पुरवठा खंडीत केला. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती ला विचारणा न करता विद्युत लाईन जर वसुली पथक कापत असेल तर नागरिकांना विचारत असतील का ?
ग्राम पंचायत वराडा अंतर्गत वराडा व वाघोली गावात बुधवार ला दुरूस्ती करिता लॉईट बंद असते परंतु नेहमी कोणत्याही दिवसी दोन, चार तास विद्युत पुरवठा खंडीत केला जातो तर कधी कधी रात्र रात्र भर विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागुन नागरिकांत महाविरणा विरूध्द रोष निर्माण होत आहे. यामुळे नियमित विद्युत पुरवठा करण्यात यावा. लॉकडाऊन मुळे थकीत विद्युत बिल भरण्यास मुदत देत घरमालकाला विचारपुस व पुर्व सुचना देऊनच विद्युत लाईन कापण्यात यावी. नागरिकांच्या घरावरून किंवा अगदी जवळुन गेलेली विद्युत लाईन दुसरी कडे हलविण्यात यावी. ज्या प्रमाणे विद्युत बिलाची वसुली केल्या जाते. त्याच प्रमाणे नियमित विद्युत पुरवठा करित व्यवस्थित विद्युत बिल आकारून ग्रामिण विद्युत ग्राहक नागरिकांना नियमित सेवा प्रदान करून त्यांचे समाधान करण्यात यावे. अन्यथा नागरिकांचा मोर्चा आपल्या कार्यालयावर आणुन संबधित उच्च अधिकारी, पालकमंत्री नितीन राऊत साहेब कडे विद्युत समस्या सोडविण्या करिता रितसर तक्रार करण्यात येईल. अशी मागणी ग्रामपंचायत वराडा सरपंचा विद्याताई चिखले हयांनी मा.कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय कन्हान यांना निवेदन देऊन केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज