Breaking News

*डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु*

*डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – डुमरी अण्णा मोड येथील नहरा जवळ शौच्छास गेलेल्या ट्रक चा क्लीनअर सागर यादव या युवकाचा नहरात डुबुन मुत्यु झाला.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शितला माता मंदीर कामठी रहिवासी सागर उर्फ सोनु प्रताप यादव वय २३ वर्ष हा सोमवार ला सकाळी १० वाजता घरून कामावर जातो म्हणुन निघाला. हा ट्रक वर क्लीनअर चे काम करित असुन ट्रक डुमरी अण्णा मोड जवळ ना दुरूस्त झाल्याने मंगळवार दिनांक २८ जुलै २०२१ ला १०.३० वाजता दरम्यान क्लीनअर डुमरी अण्णा मोड जवळील नहारा कडे शौच्छास गेला होता. नहरात कुणीतरी बुडाल्याचे महिलाने ओरडल्याने ट्रक ड्रायव्हर तेथे जावुन पाहिले तर बाजुला क्लीनअर चा डुपट्टा पडलेला दिसल्याने स्थानिय नागरिकांनी कन्हान पोलीसांना माहिती देताच कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबार्ते स्टाप सह घटनास्थळी पोहचुन सागर चा नहरात शोध सुरू केला. काही वेळाने नहराचे पाणी बंद करण्यात आल्याने सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान क्लीनअर सागर यादव चा मुत्युदेह नहरातुन बाहेर काढुन ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे श्वविच्छेदना करिता पाठविण्यात आला. ट्रक क्लीनअर सागर यादव चा पाय घसरून नहरातील पाण्यात पडल्याने डुबुन मुत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याने कन्हान पोलीस घटनेचा पुढील तपास करित आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …