Breaking News

*प्राथमिक शाळा बोरडा येथे सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न*

*प्राथमिक शाळा बोरडा येथे सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक –  दि.31/07/2021 रोज शनिवार ला जि. प.उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.जि.प.उच्च प्राथमिक शाळा मनसर येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक मा.श्री.राजूजी कडू हे आपल्या कार्यतून सेवानिवृत्त झालेत.तसेच बोरडा येथील मुख्याध्यापक श्री.अशोक उईके यांची पदोन्नती होऊन ते शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आता काम पाहणार आहे.त्याचप्रमाणे बोरडा शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.रणभिड मोटघरे यांची भिल्लेवाडा येथे समायोजन बदली झाली.व कान्द्री माईन येथील सहाय्यक शिक्षिका श्रीमती.भारती राव यांचीदेखील पवनी जवळील मौदी येथे समायोजन बदली करण्यात आली.

या सर्वांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ एकत्र कार्यक्रम पार पाडण्याचे संपूर्ण आयोजन श्री.राजकुमार पचारे केंद्रप्रमुख मनसर यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री.जगदीश अडमाची हे उपस्तीत झाले होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समिती बोरडा चे उपाध्यक्ष श्री.उमाशंकर सूर्यवंशी व सदस्य बबन हजारे तसेच श्री.रामनाथ धुर्वे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती रामटेक हे

उपस्तीत होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वांढरे यांनी केले.व आभार वासाडे सर यांनी मानले..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …