Breaking News

*पारशिवशी येथे समर्थ बुथ अभियान नियोजन बैठक संपन्न* *पारशिवनी तालुक्यात भाजप ला मजबूत करा – अरविंद गजभिए*

*पारशिवशी येथे समर्थ बुथ अभियान नियोजन बैठक संपन्न*

*पारशिवनी तालुक्यात भाजप ला मजबूत करा – अरविंद गजभिए*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार समर्थ बुथ अभियान च्या नियोजना करिता पारशिवनी येथे खळतकर सभागृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैकठी मध्ये भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित बुथ प्रमुखांना , शक्ति केंन्द्र प्रमुखांना व पदाधिकाऱ्यांना समर्थ बुथ अभियान यशस्वी पणे राबवुन तालुक्यात भाजप ला मजबूत करण्याचे कार्य करावे असे कडकडीचे आव्हाहन जिल्हाअध्यक्ष अरविंद गजभिए यांनी केले आहे .


भाजपा महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार दिनांक ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान समर्थ बुथ अभियाना अंतर्गत पूर्व नियोजना करिता बुधवार २८ जुलै २०२१ ला भाजपा पारशिवनी तालुका च्या वतीने शहरातील खळतकर सभागृह येथे माजी आमदार समर्थ बूथ अभियान रामटेक विधानसभा प्रमुख चरण वाघमारे व माजी आमदार,प्रदेश कार्यकारणी सदस्य डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये , महामंत्री किशोर रेवतकर , महामंत्री अजय बोढारे , तालुका अध्यक्ष अतुल हजारे , मंत्री जयराम मेहरकुळे , जेष्ठ नेते कमलाकरजी मेंघर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली‌ असुन या बैठकी मध्ये भाजता नेत्यांनी सर्व बुथ प्रमुख , शक्ति केंन्द्र प्रमुख , सर्व शक्ति केंन्द्र विस्तार , ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , नगरसेवक , नगरसेविका सह इतर पदाधिकाऱ्यांना संबोधित करुन सांगितले कि
समर्थ बुथ अभियान यशस्वी पणे राबवुन तालुक्यात भाजप ला मजबूत करण्याचे कार्य करावे असे कडकडीचे आव्हाहन जिल्हाअध्यक्ष अरविंद गजभिए यांनी व आदि नेत्यांनी केले आहे .

या बैठकी मध्ये भाजपा नेता राजेश ठाकरे , प्रकाश वांढे , कामेश्वर शर्मा , रामभाऊ दिवटे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , राजेश कडु , रिंकेश चवरे , नरेश पोटभरे , अशोक कुथे , नरेश मेश्राम, श्रवण वतेकर , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक वैद्य , माधुरी भिमटे , रेखा दुणेदार , छाया येरखेडे , राजेंन्द्र शेंदरे , मयुर माटे , सचिन वासनिक , धर्मेंद्र गणवीर , रुषभ बावनकर , अजय लोंढे , शिवाजी चकोले , गुरूदेव चकोले , सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …