Breaking News

*प्लाँनेट आयटी चे संचालक अभिषेकसिंग गहरवार यांनी जपली सामाजिक बांधिलकी* *आपल्या मीत्रांसोबत केली गतीरोधकांची रंगरंगोटी*

*प्लाँनेट आयटी चे संचालक अभिषेकसिंग गहरवार यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

*आपल्या मीत्रांसोबत केली गतीरोधकांची रंगरंगोटी*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेरः वर्तमान स्थितीत सावनेर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सदोष डांबरीकरण करण्यात आले. सोबतच महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन स्पीड ब्रेकर चे निर्माण सुद्धा करण्यात आले, स्पीड ब्रेकर हे खऱ्या अर्थाने अपघात कमी करण्यासाठी बनविण्यात येतात परंतू नवीन स्पीड ब्रेकर हे अपघाताची जननी झाले.


मागील काही दिवसात होणाऱ्या अपघातांची संख्या अचानक वाढली. निर्माण करण्यात आलेले स्पीड ब्रेकर योग्य मानक व मापदंडानचसार न तयार करता आवश्यकतेपेक्षा जास्त उंच असल्याने व त्यावर वेळीच रंगरंगोटी न केल्यामुळे अनेक अपघात घडले.अनेकांना आपले हातपाय मोडून घ्यावे लागले तर अनेक आजही अतीदक्षता विभागात उपचाराधीन आहे.


अशीच घटना काही दिवसांपूर्वी सावनेर शहरातील प्लॅनेट आय टी चे संचालक श्री अभिषेकसिंह गहरवार हे सायंकाळी पेट्रोल पंप कडे जात असताना नवीन ब्रेकर न दिसल्याने अपघात ग्रस्त झाले, त्यांना जबर मार लागला होता. या बातमी ची दखल काही वृत्त समूहाने घेऊन बातमी प्रसिद्ध केली होती. पण या बातम्यांचा कुठलाही प्रभाव कुणावरही झाला नाही.शेवटी श्री अभिषेकसिंह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सदस्य सूरज सेलकर आणि श्रीकांत ढोबळे यांनी स्वतः या स्पीड ब्रेकर ला रंगविण्याचा विडा हाती उचलला. नाग मंदिर ते विश्राम गृहा पर्यंतचे दोन्ही बाजूला असलेले स्पीड ब्रेकर रात्रीच्या वेळेस रंगवून टाकले. वाढत्या अपघातांना लक्षात घेता कसल्याही प्रकारची जीव हानी भविष्यात घडू नये या करिता हे काम आम्ही कुणालाही दाद न मागता स्वतः करीत आहों, असे अभिषेकसिंह गहरवार यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले.*

सदर सदोष डांबरीकरणाच्या कार्यांची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर डांबरीकरणाचे कार्याची लागत आठ कोटीच्या वर असल्याची सोबतच सदर आठ कोटीच्या डांबरीकरणाचे कार्य सदर स्थानिक कांत्रटदाराने आठ ते दहा दिवसांत थातुरमातुर तर्हेने कल्याचेही बोलल्या जात आसुन सदर सदोष डांबरीकरणाच्या कार्याची गुणवत्ता विभाग “क्वालिटी कंट्रोलर “ मार्फत योग्य रितीने केल्यास संबधीत बांधकाम विभागाचे जाणीवपुर्क दुर्लक्ष करीत कांत्रटदार लाड पुरवील्याचे व डांबरीकरणाच्या कार्यात अनेक अनियमितता आढळून आल्याशीवाय राहणार नाही.

व जवळपास साडे आठ कोटीच्या या डांबरीकरणाचे कार्य भर पावसाळ्यात तर झालेच सोबतच रस्त्यावरील धुळ व माती सुध्दा योग्यरित्या काढण्यात आली नाही त्यामुळे सदर डांबरीकरणाच्या कार्यात मोठा आर्थीक खेळ झाल्याचे निष्पन्नास आल्या शिवाय राहणार नाही.तर सदोष गतीरोधकांमुळे होत असलेल्या अपघांचा सदर कांत्रटदार ल संबधीत बांधकाम विभागास दोषी मानुन त्यांचेवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी जोर घरू लागली आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …