*कन्हान येथे विविध संघटने द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी* *कामठी येथे भाजपा द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*कन्हान येथे विविध संघटने द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

 

*कामठी येथे भाजपा द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

कन्हान / कामठी प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे महाराष्ट्र भुषण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक १ आॅगस्ट २०२१ ला

*कांन्द्री ग्रामपंचायत*

येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सरंपच बलवंत पडोळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सदस्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .

*विदर्भ टेलर्स एसोसिएशन*

द्वारे संताजी नगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन‌ सामाजिक कार्यकर्ता प्रेम रोडेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली .

*नवोदय जनोत्थान संघटन*

द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व संताजी नगर येथे करण्यात आले असुन संघटने चे अध्यक्ष प्रवीण गोडे व इतर पदाधिकारी सदस्यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता संघटने चे सचिव प्रदीप बावने , सह आदि पदाधिकार्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नवोदय जनोत्थान संघटन च्या पदाधिकार्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

*भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा*

द्वारे दीक्षा भूमि चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिए यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता भाजत नेता जयराम मेहरकुळे , रिंकेश चवरे , लीलाधर बर्वे सह आदि पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी*

द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर कांन्द्री येथे करण्यात आले असुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकार्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .

*कन्हान शहर विकास मंच*

द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर कांन्द्री येथे करण्यात आले असुन मंच नवनिर्वाचित सदस्य महेंन्द्र साबरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता मंच कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर व कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .

*कामठी येथे भाजपा अनुसूचित जाति आघाडी*

द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन आनंद नगर येथे करण्यात आले असुन भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया व भाजपा अनुसूचित जाति आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता महामंत्री उज्वल रायबोले , महेंन्द्र वंजारी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …