*कांन्द्री येथे स्वच्छता पंधरवाडा ची सुरूवात*

*१५ ऑगस्ट स्वातंत्र दिन साजरा करून स्वच्छता पंधरवाडा ची सांगता होईल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नेहरू युवा केंन्द्र , विर शिवाजी क्रिडा मंडळ व कांन्द्री ग्राम पंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने कांन्द्री गावात स्वच्छता पंधरवाडाची सुरूवात करून १ ते १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाने स्वच्छ गाव मोहीम राबवुन जनजागृती व श्रमदान करून स्वच्छता पंधरवाडा राबवुन “स्वच्छ गाव, सुंदर गाव करण्यात येईल.
रविवार दिनांक १ ऑगस्ट २०२१ ला कांन्द्री येथे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार संलग्न नेहरू युवा केंन्द्र, विर शिवाजी क्रिडा मंडळ कांन्द्री व कांन्द्री ग्राम पंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने कांन्द्री गावात “स्वच्छ गाव” ची शपथ घेऊन दिनांक.१ ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवाडा ची सुरूवात करण्यात आली. सोमवार दिनांक.२ ऑगस्ट ला गाव स्वच्छता अभियान राबवुन गाव स्वच्छ करण्यात आले. मंगळवार दिनांक .३ ते ६ ) ला स्वच्छता जनजागृती रैलीने जन संपर्क, (शनिवार दिनांक. ७ ते १०) ला निबंध स्पर्धा, ( बुधवार दिनांक.११ ते १४) सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवुन रविवार दिनांक.१५ ऑगस्ट ला स्वातंत्र दिन साजरा करून स्वच्छता पंधरवाडा ची सांगता करण्यात येईल. या अभियाना च्या यशस्वितेकरिता नेहरू युवा केंन्द्र, विर शिवाजी क्रिडा मंडळ कांन्द्रीचे पदाधिकारी, सदस्य आणि कांन्द्री ग्राम पंचायत चे पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी सहकार्य करित आहे. कांन्द्री “स्वच्छ गाव, सुंदर गाव” करण्या करिता गावातील मान्यवर मंडळी, सर्व ग्रामस्थ नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन स्वच्छता अभियान प्रमुख व विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्याम मस्के यानी केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज