*मनसेची गोंदिया जिल्ह्यातील व शहरातील कार्यकारिणी गठित*
गोंदिया – आज दिनांक १ ऑगस्ट रोजी रविवारी शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया ची जिल्हा पदाधिकारी बैठक जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पाडली. या बैठकीत *महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेंमत भाऊ गडकरी* यांनी व्हिडिओ कान्फर्स वर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. या गोंदिया जिल्हा मध्ये आपण सर्व नवयुक्त पदाधिकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी मेहनत घ्या व आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्या ठिकाणी जोमात काम करा असे सांगितले.या मध्ये अर्जुनी मोरंगाव विधानसभा अध्यक्ष कमेलश बिसेन, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मौजे, गोंदिया तालुका उपाध्यक्ष राहुल येवलकर, दवनीवाडा तालुका उपाध्यक्ष वैभव खोब्रागडे,मनसे विद्यार्थी सेना गोंदिया शहर अध्यक्ष रितीक नागपुरे, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष राज बिरिया, शहर उपाध्यक्ष निखिल गडपायले, मनसे गोंदिया शहर उपाध्यक्ष अनिकेत सांडेकर, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढोंगे या सर्वांना नियूक्ती पत्र देऊन नेमणूक करण्यात आली. या बैठकीत सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषण बैस, गोरेगाव तालुका अध्यक्ष शैलेश जांभुळकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे शहर उपाध्यक्ष रजत बागडे, खेमा ठाकरे, आमगांव तालुका उपाध्यक्ष राजेश सोनवाने, ध्रुव हुकुरे, अमित अग्रवाल, दिलीप ढेकवार, विरेंद्र बनकर, शिवा नागरे, नितेश महारवाडे, निलेश टेवानी, निखिल गलानी, नितेश गायधने, शिवशंकर वाढई, योगेश कुर्वे, सुबोध शेंडे, खुशाल कालसर्पे, रोहित नागपुरे, सुमीत हुवारे, व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.. या बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज