Breaking News

*ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरु करा- शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांची मागणी*

*ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरु करा- शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांची मागणी*

जिवती:- सध्या लाॅकडाउन असल्यामुळे जिवती तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद केल्या मूळे त्याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजुर व सामान्य नागरिकांना बसत आहे. कारण जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता,शेति निविष्ठा खरेदी,आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री,विविध कामा करीता गडचांदूर येथे जाणे-येणे करावे लागते, बस सेवा बंद असल्यामुळे सदर बाबीचा फटका फक्त शेतकरी व शेतमजुरास व सामान्य नागरिकास बसलेला आहे, कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही.
करीता एस.टी. महामंडळा मार्फत गडचांदूर ते पाटण मार्ग जिवती व गडचांदूर ते नगराळा मार्ग जिवती
याप्रमाणे बस सेवा तातडीने सुरू करावि अशी मागणी, शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देवून केलेली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …