Breaking News

*सर्वप्रथम संशोधन करतांना संशोधकाने साहित्याचा शोध घ्यावा -डॉ.एन.बी.सिंग*

*सर्वप्रथम संशोधन करतांना संशोधकाने साहित्याचा शोध घ्यावा –डॉ.एन.बी.सिंग*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी आणि तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने *”वैज्ञानिकांचे संशोधनात्मक लेख आणि त्यांचे लेखन संदर्भात मुल्याकंन “* या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.या वेबिनारचे प्रमुख अतिथी नागपूर विभागातील उच्च शिक्षण, सहसंचालक डॉ.एस.आर.ठाकरे हे होते तर प्रमुख वक्ते म्हनूण डॉ.एन.बी.सिंग शारदा विद्यापिठ ,ग्रेटर नोयडा,उत्तरप्रदेश हे होते.या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी पोरवाल महाविद्यालय कामठीचे प्राचार्य डॉ.एम.बी.बागडे तर वेबीनार संरक्षक म्हणुन तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे या होत्या.


या वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉ.एन.बी.सिंग यांनी विज्ञानातील संशोधनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि वैज्ञानिक संशोधन कसे करावे ? याबद्दल सांगताना संशोधन करीत असतांना संशोधकाने सर्वप्रथम साहित्याचा शोध घ्यावा ,त्या साहित्यातून आवश्यक असलेली माहीती गोळा करावी कारण साहित्याची व्याप्ती खूप मोठी असते.आपण गोळा केलेली माहिती आपल्याशिवाय कुणी वापरली नाही याची शहानिशा करुन घ्यावी.व नतर तिचा वापर करावा ,असे मोलाचे मार्गदर्शन केले,शिवाय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
या वेबिनारमध्ये सहभागी सदस्यांची संख्या १२०० इतकी होती.त्यामध्ये ४१% विषयातील विद् वान प्राध्यापक ,३२% साहाय्यक प्राध्यापक , ५% सहयोगी प्राध्यापक आणि १९% स्नातकोत्तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोदंविला.या वेबिनार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदंविला.
या वेबिनारचे संयोजक पोरवाल कॉलेजचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.जी.चौधरी व तायवाडे महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी.एस.भास्कर हे होते,डॉ.आर.जी.चौधरी यांनी आपल्या प्रास्‍ताविकातून वेबिनारच्या विषयाचा परिचय करून दिला.वेबिनारमध्ये इतर विषयाच्या तज्ञांनी सुद्धा आपली मते व्यक्त केली,त्यामध्ये डॉ.प्रशांत ढोंगले यांचे महत्वपूर्ण असे योगदान होते.
या वैज्ञानिक विषयाच्या वेबिनारमध्ये डॉ.आलोक रॉय,डॉ.सिध्दार्थ मेश्राम,डॉ.मंजिरी नागमोते,डॉ.दिलीप चाफले,डॉ.प्रेरणा थोरात यांनी सुध्दा अविरत परिश्रम घेतले.या वेबिनारचे प्राथमिक स्वरुप रसायनशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. एस.मंडल आणि वाणिज्य विभागाचे डॉ. तुषार चौधरी यांनी तयार केले होते.तर तंत्रज्ञानात्मक सहयोग डॉ.सी.एस.भास्कर यांनी परिपूर्ण केले. शेवटी या वेबीनारचे आभारप्रदर्शन डॉ.सी.एस.भास्कर यांनी केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …