Breaking News

*युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांन्द्री सरपंचानी घेतली दखल*

*युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांन्द्री सरपंचानी घेतली दखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री- कन्हान परिसरात गेल्या काही दिवसान पासुन डेंगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत असल्याने युवक काॅंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी कांन्द्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे यांना एक निवेदन देऊन डेंगु व साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्या करिता तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली असता सरपंच बलवंत पडोळे यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत कांन्द्री परिसरात फाॅगिंग मशीने फवारणी सुरू करून अन्य साथीच्या रोगाविषयी जन जागृतीचे कार्य सुरू केले.


दरवर्षी ऋृतुत बदल होत पावसाळयात दुषित पाणी, हवा, अस्वच्छ वातावरण असल्यामुळे विविध घातक रोगाचा प्रसार होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असुन स्थानिक प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याने कांद्री कन्हान परिसरात डेगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत असल्याने प्रशासनाने फॉगींग मशीने औषधीची फवारणी करून नागरिकांत जनजागृति अभियान राबवुन तात्काळ अश्या रोगांना थांबविण्याकरिता उपाय योजना करायला पाहिजे. यास्तव कांन्द्री युवक काॅंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच बलवंत पडोळे यांना एक निवेदन देऊन तात्काळ डेगु व साथीच्या रोगावर आळा घालण्याकरिता उपाय योजना करण्याची मागणी केली असता सरपंच बलवंत पडोळे यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना कांन्द्री परिसरात फाॅगिंग मशीनने औषधी फवारणी सुरू करून अन्य साथीच्या रोगाविषयी जनजागृतीचे कार्य सुरू केले. यामुळे नागरिकांना थोडी राहत मिळाल्याने नागरिकांनी कांन्द्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्याम कुमार बर्वे, धनराज कारेमोरे, ग्राम विस्तार अधिकारी इंगळे, ग्रामपंचायत सदस्यांचे कांन्द्री युवक कॉग्रेसचे पदाधिकारी राहुल टेकाम, गणेश सरोदे, निकेश मेश्राम, अभय जांबुतकर, अक्षय देशमुख, पारस मरघडे, गणेश आकरे, विकास ठाकरे आदिंचे आभार व्यक्त केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …