*ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे गुरूवर्य शिक्षकांक्षी नदी प्रदुर्शन मुक्त करण्यास सुसंवाद चा प्रारंभ*

*नदीत सांडपाणी, घाण, उद्योगाचे दुषित पाणी सोडुन प्रदुर्शन करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल करा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर जिल्ह्याची लाईफ लाईन कन्हान नदी हे पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत नदी प्रदुर्शित करण्याचा गोरखधंदा बिनधास्त पणे सुरू असल्याने कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करण्याचे अभियान सुरू केल्यावर ही शासन, प्रसाशनाच्या निष्काळजीपणा मुळे व दुर्लक्षा मुळे भयंकर प्रदुर्शित झाली आहे तरी प्रदुशित करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही होत नसल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे कन्हान नदीचे हक्काचे पिण्याचे पाणी संपुर्ण नागपुर जिल्ह्यास मिळण्याकरिता कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करण्याकरिता मोठे जल जनआंदोलन करण्याकरिता गुरूवर्य शिक्षकांक्षी सुसंवाद अभियानाचा कन्हान शहरातुन शुभारंभ करण्यात आला.
नागपुर जिल्हयाची लाईफ लाईन कन्हान नदीत नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका च्या लोक वस्तीच्या सांडपाणी, गटार, मच्छी, मटन व चिकन बाजार, कत्तलखाने, दवाखाने, कारखाने, कोळसा खाणी, औष्णीक विधृत केंन्द्र, उद्योगधंद्याचे विषारी घाणीसह सांडपाणी कुठलिही प्रक्रिया न करता सरळ नदीत सोडुन नदीत गटारगंगेचे विष कालविण्याचे अधिकार संबधित अधिकाऱ्यांना दिले कोणी ? पिण्याच्या पाण्यात विष टाकणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होते. तर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कन्हान नदी प्रदुर्शित करू नये, कार्यवाही करण्या विषयी वारंवार सुचना, आदेश महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाने हरित लवाद व टॉस्क फोर्स च्या आदेशित मार्गदर्शनात दिलेल्या आदेशाची कुठलिही कार्यवाही न करता केळाची टोपली दाखवुन बिनधास्त पणे नदी प्रदुर्शित करण्याचे कार्य सुरु असुन नदी प्रदुर्शित करण्याऱ्या संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून नदी प्रदुर्शन मुक्त व संवर्धन करण्यात यावे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर येऊन पिण्याच्या पाण्या करिता मोठे जल जन आंदोलन होण्याची पाळी येऊ देऊ नका असे सुतोचवाच ग्रामो न्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केले असुन कन्हान शहरातील प्रमुख शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकांशी सुसंवाद साधुन नागपुर जिल्हयातील पिण्याच्या पाणीचे नैसर्गिक स्त्रोत कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करून संवर्धन करण्या करिता जल जन आंदोलन उभारण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रकाश जाधव, मोतीराम राहटे, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, कमलसिंग यादव, ऋृषभ बावनकर, प्रविण माने सह आदि ने कन्हान शहरातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्याल प्राचार्य श्री बनकर सर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय मुख्याध्यापक श्री आस्टकर सर, बळीराम दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखा ठमके, विकास हायस्कुल मुख्याध्यापक राजेश खंडाईत, धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय कांद्री-कन्हान प्राचार्या सौ प्रमिता वासनिक, उपप्राचार्य श्री साखरकर सर, धर्मराज प्राथमिक प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई भोयर, आयडि यल संस्थेचे सचिव भरत सावळे, आदर्श हायस्कुल मुख्याध्यापिका सी एन मेश्राम, प्राथमिक मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, हिराबाई उच्च प्राथमिक शाळा व वस्तीगृहाचे संचालक श्री नरेंद्र वाघमारे, मुख्याध्यापिका सौ वंदना रामापुरे सह सर्व प्राध्यापक शिक्षकांनी सुसंवादास उत्तम प्रतिसाद देऊन कन्हान नदी बचाव अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. असुन पहिल्या टप्यात जिल्हयातील तालुकानिहाय प्रमुख शाळा, कनिष्ठ व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकांशी तसेच दुसऱ्या टप्यात इंजिनिअर, वैद्यकीय, समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थ्यी आणि डॉक्टर, व्यापारी, सामाजिक संस्था पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधुन कन्हान नदी प्रदुर्शन मुक्त करून संवर्धन करण्याकरिता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे मोठे जल जन आंदोलन करण्यात येणार आहे .
Maharashtra News Media सच की आवाज