Breaking News

* औष्णिक विघुत केंन्द्र खापरखेडा येथे विघुत कर्मचा-यांची द्वारसभा संपन्न*

* औष्णिक विघुत केंन्द्र खापरखेडा येथे विघुत कर्मचा-यांची द्वारसभा संपन्न*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- दिनांक 10/8/2021 रोजी “संविधान विरोधी विद्युत कायदा 2021” चा विरोध दर्शविण्याकरिता 210 mw गेट समोर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन शाखा खापरखेडा तर्फे केंदीय उपाध्यक्ष निलेश गजभिये यांचे अध्यक्षते खाली व वरिष्ठ कार्यकर्ते मा.ठवरे साहेब व मा आर.जी.मेश्राम साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या सभेत प्रथम ठवरे यांनी संघटन,कर्मचारी एकजूटता आणि आंदोलनाची गरज यावर मार्गदर्शन केले.

सभेचे अध्यक्ष निलेश गजभिये साहेब यांनी प्रस्तावित विद्युत कायदा 2021 पारित झाल्यास त्यामुळे कर्मचारीवर्ग आणि सामान्य नागरिक यांच्या वर होणारे नुकसान व दुष्परिणाम यांच्यावर सखोल मार्गदर्शन केले.

*द्वार सभेला मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी सभासदांनी उपस्थित राहून आंदोलनाविषयी जागृत असल्याचा परिचय घडवून दिला

सभेचे संचालन संघटनेचे सचिव मा.टी.एच.सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन मा.डिसेनजी सहारे यांनी केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …