*तुकडोजी महाराज यांचे विचार घरोघरी पोचावे म्हणून अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडल तर्फे सामुदायिक ध्यान व ग्रामगीता पाठाचे वाचनाचे आयोजन*

नागपुर: दि.११/०८/२०२१ बुधवार ला सामुदायिक ध्यान व ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम सुनील बर्गी, कोराडी यांचे कडे संपन्न झाला. ध्यानाच्या महत्वावर ह.भ. प. चंद्रभान बेहुने महाराज, पारशिवनी तालुका प्रचारक अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ, यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख उपस्थिती प्रकाश भालेराव, पुंडलिकबाबु चौधरी, बबनराव ढेंगरे, सुनिल बर्गी, बाळकृष्ण झाडोकर, चिंतामन मेश्राम, सुरेश चौधरी, सपकाळ, आनंदराव पाखरे, भुदेवजी वांढे, ईश्वर काकडे, सुरेश सोनवाने, देवनाथ माहुरे, कुमार युगल राऊत, सौरभ बर्गी इ.उपस्थित होते. स्वातंत्र्य संग्राम सैनिक, गांधीवादी व सर्वोदयी कार्यकर्ते कै.दत्तात्रय बर्गी ह्यांना श्रद्धांजली देण्यात आली आणि सरतेशेवटी राष्ट्र वंदना घेण्यात आली. उद्या दि.१२/०८/२०२१ गुरुवारी ला सकाळी ६:००ला. सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम श्री.सपकाळजी दहेगाव, यांचे कडे होईल तरीही क्रुपया सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे हीच विनंती. तसेच सर्वांनी मास्क व सँनिटायझरचा वापर करावा.
Maharashtra News Media सच की आवाज