Breaking News

*तायवाडे महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी*

*तायवाडे महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- तायवाडे महाविद्यालयात दि.
12.08.2021 ला पदमश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 129 वी जयंती *”ग्रंथपाल दिवस”* म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी IQAC समन्व्यक डॉ. गिरीश काटकर यांनी डॉ रंगनाथन च्या प्रतिमेस माल्यर्पण करून अभिवादन केले. त्यांनी ग्रंथालयाचे महत्व सांगून त्याचे आपल्या जीवनात भरपूर वापर कसे करावे याचे मार्गदर्शन केले. ग्रंथापाल मंजुषा मामीलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन करित डॉ रंगनाथन यांचा जीवनपट तसेच ग्रंथालय क्षेत्राचे खडतर प्रवासावर प्रकाश टाकला . डॉ गजानन पोलेनवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजेंद्र वाटणे, डॉ. वर्षा वैद्य, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. कमलेश डाबरे, प्रा. सुनील घुगल, डॉ.वकील शेख, प्रा.अशोक वानखेडे, डॉ. थोरात व इतर प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शरयूताई तायवाडे याच्या मार्गदर्शनअंतर्गत कार्यक्रम यशस्वी झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास महाविद्यालयातील ग्रंथालय कर्मचारी शिवशंकर चरपे व सुधीर सातपुते व इतर कर्मचाऱ्यांना परीश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …