*सोनेकर काँलेज आँफ फार्मसी तर्फे श्री पी. बी. सोनेकर यांना भावपुर्ण आदरांजली*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- रवि बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था कोराडी स्थित सोनेकर काँलेज आँफ फार्मसी व रवि इस्टिटूट आँफ डिप्लोमा इन फार्मसी च्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री पी. बी. सोनेकर यांची १४ वी पुण्यतिथी दि १२.०८.२१ रोजी
श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुण्यतिथी प्रित्यर्थ राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महादुला- कोराडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच स्थानिक परिसरात व पोलीस स्टेशन कोराडी येथे सॅनिटायझर व मास्क चे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला रवी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव एम. पी. सोनेकर, सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर अमित मलिये, रवी इन्स्टिट्यूट आँफ डिप्लोमा इन फार्मसी चे प्राचार्य सी. बी. चौरिया, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ आर. ए. साहू आदी मान्यवर उपस्थित होते. सॅनिटायझर व मास्कचे वितरण स्थानिक परिसरात यशस्वीरित्या पार पडावा याकरिता डॉ आर ए साहू, पी. सी माटे, वाय. टी. जांभुळकर आदिने प्रयत्न केले.

तसेच सदर कार्यक्रमास संस्थेतील प्राध्यापक प्राध्यापिकावृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम शेंडे यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज