*कन्हान व कांन्द्री येथे विश्व आदिवासी दिवस साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे विश्व आदिवासी दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करून जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
सोमवार दिनांकदि.९ ऑगस्ट २०२१ ला विश्व आदिवासी दिवसा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करून जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे कार्यकारी संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, जेष्ठ नागरिक भरत सावळे, महेंन्द्र साबरे, हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान , चंदन मेश्राम, रविंद्र सांकला, राजु पचकलसिया सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
*कांद्री ग्रामपंचायत येथे विश्व आदिवासी दिवस साजरा*
कन्हान : – कांन्द्री ग्रामपंचायत येथे विश्व आदिवासी दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
सोमवार दिनांक.९ ऑगस्ट ला विश्व आदिवासी दिवसा निमित्य ग्राम पंचायत कांन्द्री येथे कार्यक्रमाचे आयोजन करून सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व नागरिकांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी धनराज कारेमोरे, प्रकाश चाफले, ग्राम पंचायत सदस्य राहुल टेकाम, गणेश सरोदे, गजानन हटवार, निकेश मेश्राम, अभय जांबुतकर, अक्षय देशमुख, गणेश आकरे सह ग्रा पं कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज