Breaking News

*बसपा च्या एकदिवसीय प्रक्षिक्षण शिबीराला नागरिकांच्या भरपूर प्रतिसाद* *बहुजन समाज पार्टी शिस्तबद्ध व व्यवस्था परिवर्तनासाठी १९८४ – संदीप ताजने*

*बसपा च्या एकदिवसीय प्रक्षिक्षण शिबीराला नागरिकांच्या भरपूर प्रतिसाद*

*बहुजन समाज पार्टी शिस्तबद्ध व व्यवस्था परिवर्तनासाठी १९८४ – संदीप ताजने*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – बहुजन समाज पार्टी द्वारे कामठी विधानसभा क्षेत्रांत आकांशा स्टडी सर्कल येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले असुन या प्रशिक्षण शिबिराला बसपा च्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले असुन नागरिकांनी या एकदिवसीय प्रक्षिक्षण शिबीराला भरपूर प्रतिसाद दिला आहे .
शुक्रवार दिनांक ०६ आॅगस्ट २०२१ ला बहुजन समाज पार्टी द्वारे कामठी विधानसभा क्षेत्रांत आकांशा स्टडी सर्कल येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले असुन या प्रशिक्षण शिबिराला बहुजन समाज पार्टी चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.एड.संदीप ताजणे साहेब यांनी भेट दिली असता शिबिराला मार्गदर्शन करतांना म्हणाले कि बहुजन समाज पार्टी शिस्तबद्ध व व्यवस्था परिवर्तनासाठी १९८४ पासून प्रयत्नशील असुन हल्लीच्या काळात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी कोरोणा महामारी च्या नावावर गरीब, असहाय्य, असंघटित कामगार बहुजन समाजाचे फार मोठे नुकसान केले असुन राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बहुजन समाजातील असंघटित कामगारांवर उपासमारीची चे दिवस आले असुन या शिबिराला बहुजन समाज पार्टीचे राज्याचे मा. रवींद्र गवई यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. बसपा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्याचे महासचिव नागोराव जयकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले असुन शिबिराला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, नितीन सिंगाडे, बाबुल डे, विजय कुमार डहाट, महेंद्र रामटेके, मोहम्मद शफी ,नागपूर जिल्हा महिला विंगच्या सचिव मायाताई उके, नागपूर जिल्हा महिला विनच्या संघटन सचिव साधनाताई काटकर, रमाबाई गजभिये ,कामठी विधानसभा क्षेत्राचे इन्चार्ज चंद्रशेखर पाटील ,प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिराचे सुत्र संचालन कामठी विधानसभेचे अध्यक्ष विक्रांत मेश्राम यांनी केले असुन शिबिराचे प्रास्ताविका किशोर गेडाम यांनी केले तर आभार कामठी शहर महिला विंगचे अध्यक्षा सुनिता रंगारी यांनी मानले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी कामठी विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी, आत्माराम चंद्रशेखर, रामभाऊ कुर्वे, दिलीप नागदेवे, कामठी शहर बसपा अध्यक्ष विनय उके, छावणी परिषदेचे अध्यक्ष नितीन सहारे, निशिकांत टेंभेकर, विशाल गजभिये, अमित भैसारे, दिपालीताई गजभिये, प्रतिभाताई नागदेवे, ताराचंद फखिडे , मंजू ताई डहाट, आम्रपाली सोणारे, प्रिती ताई गजघाटे,विकास रंगारी, रवि मधुमटके, वर्षाताई भालेराव, उत्तम मेश्राम, मनोज मेश्राम, जीवन बावणे ,गोलू मेश्राम, सह आदि ने परिश्रम घेतले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …