*कन्हान नदी सिहोरा पात्रात अनोळखी इसमाचा मुतदेह मिळाला*
*कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ०३ किलो मीटर अंतरावर मौजा सिहोरा येथे पेपर मिल कंपनीच्या मागे कन्हान सिहोरा नदी पात्रात एका इसमाचा मृत अवस्थेत मृतदेह मिळाल्याने कन्हान पोलीसांनी सिहोरा गावाचे पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांकद.७ ऑगस्ट २०२१ ला सायंकाळी च्या सुमारास सिहोरा येथील पोलीस पाटील ग.भा आशा लेहतकर नारनवरे वय ५६ वर्ष राहणार सिहोरा यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला सुचना दिली कि गावातील शांताराम बोदु मेश्राम यांनी माहिती दिली कि पेपर मिल कंपनीच्या मागे कन्हान सिहोरा नदी पात्रात पाण्यात बुडुन मृत अवस्थेत एक प्रेत दिसुन आले आहे. सदर बातमी वरून गावकारी सोबत घटनास्थळी पोहचुन कन्हान पोलीसांना पाचारण करून प्रेताची पाहणी केली असता प्रेतास कोणी ही ओळखले नाही. मृत इसमाचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्ष असुन तो पुरुष असावा अंगात मरकट रंगाचा शर्ट व पॅन्ट कथ्था रंगाचा व पांढऱ्या रंगाचे केस असे दिसुन आले. सदर प्रकरणी फिर्यादी पोलीस पाटील ग.भा आशा लेहतकर नारनवरे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी मर्ग क्र.३०/२१ कलम १७४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन मृतका ची ओळख पटविण्या पर्यंत सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि अमित कुमार आत्राम हे करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज