Breaking News

*मेन पाईप लाईन फुटुन अर्ध्या कन्हान शहरात पाणी पुरवठा खंडित* *पाचव्या दिवसी उशिरा रात्री दुरूस्ती पुर्ण करून सहाव्या दिवसी पाणी पुरवठा सुरू*

*मेन पाईप लाईन फुटुन अर्ध्या कन्हान शहरात पाणी पुरवठा खंडित*

*पाचव्या दिवसी उशिरा रात्री दुरूस्ती पुर्ण करून सहाव्या दिवसी पाणी पुरवठा सुरू*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ४ च्या इंदिरा नगर व हनुमान नगर पाणी टाकीला पाणी पुरवठा करणारी राईजमेल मेन पाईप लाईन आबेंडकर चौक कन्हान येथे फुटल्याने पाच दिवसा पासुन अर्ध्या कन्हान शहरात पाणी पुरवठा खंडित होऊन नळाला पाणी येणे बंद असुन नागरिक त्रस्त असल्याने नगराध्यक्षा करुणा आष्टणकर व नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी स्वत: उभे राहुन पाचव्या दिवसी उशिरा रात्री पाईप लाईन दुरूस्ती करून रविवारी पाणी पुरवठा सुरू केला.
कन्हान नदीच्या पिपरी पंप हाऊस पासुन कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत इंदिरानगर व हनुमान नगर या दोन मोठया पाणी टाकीला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी राईजमेल मेनपाईप लाईन आबेंडकर चौक कन्हान येथे मंगळवार दिनांक.३ ऑगस्ट ला फुटल्याने पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नगरपरिषद व्दारे दुरूस्ती काम सुरू असुन पुर्णपणे दुरूस्ती काम न झाल्याने प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ४ येथील नांका नंबर ७, गजभिये ले-आऊट, इंदिरा नगर, शिवनगर, आनंद नगर, राधाकृष्ण नगर, सुपर टाऊन, प्रगती नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, लोहिया ले-आऊट, रामनगर, गुरफुडे ले-आऊट, गणेशनगर, पांधन रोड, हनुमान नगर, जवाहर नगर या दाट लोकवस्ती मध्ये पाच दिवसापासुन नळाला पिण्याच्या पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक चांगलेच त्रस्त असल्याने शनिवार दिनांकदि.७ ऑगस्ट ला सकाळ पासुन नगरसेवक राजेंद्र शेंदरे आणि सायंकाळ पासुन नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर स्वत: उपस्थित राहुन उशिरा रात्री पाईप लाईन ची दुरूस्ती करून घेतली आणि रविवार दिनांक .८ ऑगस्ट ला दोन्ही पाणी टाक्याला पाणी पुरवठा सुरू करून क्रमाक्रमाने नगरातील लोकवस्ती मध्यल्या नळाना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …