Breaking News

*कन्हान – पिपरी येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा* *विविध संघटन द्वारे ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान – पिपरी येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*

*विविध संघटन द्वारे ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त विविध संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन ठिक ठिकाणी करण्यात आले असुन राष्ट्रध्वज ध्वजारोहण करुन तसेच शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजलि अर्पित करुन स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .
रविवार दिनांक १५ आॅगस्ट २०२१ ला देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य

*कन्हान पोलीस स्टेशन* स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

*कन्हान – पिपरी नगरपरिषद* येथे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तसेच महापुरुषांना श्रद्धांजलि अर्पित करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी नगर परिषद कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरी , सर्व नगरसेवक , नगरसेविका , नप अधिकारी , कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*कन्हान शहर विकास मंच* द्वारे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते शहिद स्मारका वर व महापुरुषां च्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजलि देऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , महेंद्र साबरे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

*कन्हान काॅंग्रेस कमेटी*

द्वारे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन शहर अध्यक्ष राजेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी काॅंग्रेस नेता दयाराम भोयर , नगरसेविका कल्पना नितनवरे , अमोल प्रसाद , मनोज काकडे , गणेश माहुरे , सह आदि काॅंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते .

*भाजपा कन्हान शहर* द्वारे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन राम नगर पिपरी आंगनवाड़ी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक नारायण रोडेकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी भाजपा कन्हान शहर सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*कन्हान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी* द्वारे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक किशोर बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली व श्यामबाबू पिपलवा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता ध्वजारोहण करुन व परिसरात मिठाई वाटप करुन स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी किशोर बेलसरे , गणेश पानतावने , रोहित मान , सतीश बेलसरे , रवि दुपारे सह आदि राष्ट्रवादी कांग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते .

*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र* येथे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी सर्व डाॅक्टर्स , नर्स , व कर्मचारी उपस्थित होते .

*साटक प्राथमिक आरोग्य केंन्द्र* येथे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे , सह सर्व कर्मचारी उपस्थित होते .

*जवाहर नगर मित्र परिवार* द्वारे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन लहान मुलांच्या हस्ते केक कापुन व लहान मुलांना फळ , व बिस्कीट वाटप करुन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …