Breaking News

*१५ ऑगस्ट ला भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सत्कार सोहळा संपन्न* *७५ व्या स्वातंत्रदिनी विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*कन्हान येथे १५ ऑगस्ट ला भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योध्दांचा सत्कार सोहळा संपन्न*

*७५ व्या स्वातंत्र दिनी ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथे १५ आॅगस्ट ७५ व्या स्वातंत्र दिना निमित्य विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे महाकाली कॉम्पलेक्स तारसा रोड येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करुन या भव्य रक्तदान शिबीरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन व कन्हान च्या कोरोना योध्दांचा सत्कार करून स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे आपल्या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र दिना निमित्य रविवार दिनांक.१५ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९.३० ते १ वाजता पर्यंत महाकाली कॉम्पलेक्स तारसा रोड कन्हान येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रक्त पेढी, नागपुर च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करुन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री आशिष जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथि नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशन चे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोरोना काळात कन्हान शहरात व परिसरात महत्वाची सेवा आणि अमुल्य कार्य करणाऱ्या सौ पुष्पा पिल्ले, श्री प्रमोद वानखेडे, श्री मोतीराम राहटे, श्री ज्ञानेश्वर दारोडे, श्री योगेश ठाकरे सह आदिंना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिबीरात ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम राहटे, कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव सुनिल सरोदे, व युवती श्रध्दा आष्टणकर, अर्चना नानोटे तर टिम ५१ च्या सुमित खैरकार, गौरव अरोरा, निखिल सोनबरसे सह ६३ नागरिकांनी रक्तदान करून ७५ वा स्वातंत्र दिन थाटात साजरा करण्यात आला. भव्य रक्तदान शिबीरास मोठया संख्येने कन्हान परिसरातील युवकांनी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आयोजक शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, मयुर माटे, रजनिश (बाळा) मेश्राम, सुनिल लक्षणे, शमशेर पुरवले, सुरज गजभिये, आशिष वानखेडे,शैलेश ढोके, पंकज रामटेके , दिपक कुंभलकर, भरत चकोले, अशोक नारनवरे, पवन ठाकुर, बाबी लांजेवार, सोनु मसराम, शरद दुधपचारे, विष्णु भस्मे, बंटी नवघरे, राम थदानी, राधेशाम राऊत, राजु चोपकर आदी सह युवकांनी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …