Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन्स एज्युकेशन नागपुर येथे 75 स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन्स एज्युकेशन नागपुर येथे 75 स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा नागपूर येथे 15 ऑगस्ट 2021 रोजी 75 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या संचालिका वैशाली फुले उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या संचालिका वैशाली फुले प्राचार्य डॉ. अतुल टेकाडे यांनी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून ध्वजारोहण केले. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली महाविद्यालयाच्या संचालिका वैशाली फुले यांनी आपल्या भाषणात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना देश हितासाठी बलिदान करणाऱ्या सर्व
थोर पुरुषांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे देश हितासाठी आवश्यकता असल्यास बलिदान करण्याची सुद्धा तयारी असायला हवी असे, आपल्या भाषणात त्यांनी मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद प्रा. गौरव गजबे,
प्रा. हुस्त्रा झकी, प्रा. रोशनी डहारे, प्रा. रश्मी उईके, प्रा. जानवी नंदनवार, प्रा. प्रीती मानकर तसेच सहकर्मचारी नीलेश मेश्राम, मधुकर डांगे, स्नेहजित काकडे, पंकज ऊके दर्शना, वंदना आदी उपस्थित होते.
या वर्षी सुद्धा महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस हा कोरोना नियमांचे पालन करून उत्साहाने साजरा करण्यात आला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …