*दिव्य ज्योती दिव्यांग मुलामुलींची विशेष शाळा व कर्मशाळेत स्वातंत्र्य दिन साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- दिव्य ज्योती मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा व संत सिताराम महाराज प्रोढ मतिमंद निवासी कर्मशाळा व पूर्णवसन केंद्र गुमथी तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्यभान मोरे संस्थापक साई अपंग निराधार कल्याणकारी संस्था गुमथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला आशिष मोरे अध्यक्ष, साई अपंग व निराधार कल्याणकारी संस्था गुमथी गौतम मानवटकर, धनराज खडसे, कैलास चौधरी, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवर तसेच सर्व शाळा कर्मशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग तसेच हँड सनीटायझर या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका ढोबळे तर आभार प्रदर्शन श्वेता मडावी यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पिलेश्वर मोरे कर्मशाळेच्या अधिक्षीका अंजली मोरे शाळा व कर्मशाळेचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज