*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा केंद्रात ७५ वा स्वातंंत्र्यदिन कार्यक्रम संपन्न*

विशेष प्रतिनिधी
खापरखेडा:- भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा स्वातंत्र्यदिन कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात मा. श्री. गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री. डाँ. जी. पी. काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणुन माजी उपसरपंच मा. अस्मिता बागडे, मा. श्री. शंकर घोरसे, मा. श्री. पुरुषोत्तम मानकर गुणवंत कामगार पुरस्कृत, माजी केंद्र प्रमुख श्री. लक्ष्मण हरडे, तथा मा. प्रकाश कोहळे तसेच या मा. नरेश तरारे व पत्रकार श्री. दिलीप येवले प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली*. *प्रसंगी शिवणकलेत प्राविण्य मिळवलेल्या सौ. स्नेहल वाघोदे तथा सौ. वैशाली साहारे यांना धनादेश देऊन गौरविण्यात आले, तथा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुखपत्र असलेले श्रमकल्याण युग मासिक श्री. दिलीप येवले यांना देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर पुरुषांच्या जिवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालु टेकाडे ( केंद्र महिला कल्याण सहाय्यिका) यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मंदा सोनुरकर,सौ. नलिनी बेंडेकर, सुनील ऊके ,गौरव सोनुरकर, श्री. श्रीकांत अंबेरे यांनी अथक परिश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज