*सरस्वती इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय ,सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अंड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ वा स्वातंत्र्यदिन covid-19 च्या नियमानुसार पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शोभणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विभाग प्रमुख स्नेहल ताजणे यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांती वीरांच्या बलिदानाची महती सांगितली .यानंतर सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड मॅडम यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले .तसेच सरस्वती भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर प्रत्येक शिक्षकाला असलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या जडणघडनाकरिता करावा व स्वप्रगतीबरोबर देशाचे भविष्य असलेल्या पिढीच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे असे आव्हान केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. मारोती वाघ यांनी स्वातंत्र्य परवाच्या या अमृतमहोत्सवी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य जर ठामपणे बजावले तर देशव्यापी कार्य सर्वांच्या हातून घडेल असे सांगितले. कार्यक्रमाला रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीक्षा जनबादे तर आभार प्रदर्शन प्रा. विजय वनकर यांनी केले कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला .
Maharashtra News Media सच की आवाज