*तायवाडे शैक्षनिक संकुलात स्वातंत्र्यदिन साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- स्थानिक तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे आज ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे होत्या,त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला तायवाडे डीप्लोमा इन फार्मसीचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, तायवाडे पब्लिक स्कूलच्या प्राचार्य श्रीमती प्रेरणा झा ,तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधीकारी डॉ.किशोर घोरमाडे ,तायवाडे महाविद्यालयाचे शारिरिक शिक्षक डॉ.सूनिल भोतमांगे व शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज