Breaking News

*रामटेक तालुका प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अव्वल* *गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांचा पालकमंत्री मा.नितीन राऊत यांच्या हस्ते स्वागत*

*रामटेक तालुका प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अव्वल*

 

*गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांचा पालकमंत्री मा.नितीन राऊत यांच्या हस्ते स्वागत*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होताच त्याच ठिकाणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र शासन मा. नामदार श्री. नितीन राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रात अतिउत्तम काम करणाऱ्या अधिकारी वर्ग यांचा प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्याच कार्यक्रमात प्रदीप बमनोटे गट विकास अधिकारी गट.-अ पंचायत समिती रामटेक,यांना सुद्धा मा. पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन 2020-21 मध्ये महा आवास अभियान दिनांक 20 नोव्हेंबर ते 6 जून या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राबविण्यात आले. व त्यामधील शासन निर्णया नुसार या कालावधीत नागपूर जिल्ह्यात 13 पंचायत समितीमध्ये रामटेक तालुका हा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांकावर असून सर्वोतृष्ठ क्लस्टर मध्ये सुद्धा नगरधन सर्कल जिल्ह्यात प्रथम राहिला त्यामुळे रामटेक तालुक्याला त्या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रथम क्रमांकचे दोन बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मा. विभागीय आयुक्त नागपूर.श्रीमती प्राजक्ता लवंगरे मॅडम,श्रीमती.विमला.आर. मॅडम जिल्हाधिकारी नागपूर.मा.रश्मी बर्वे अध्येक्ष जी.प. नागपूर मा.योगेश कुंभेजकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जी.पं नागपूर..मा.श्री.विवेक इलमे. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जी. प.नागपूर इतर मा.वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, स्वातंत्र्य सेनानी, तथा गणमान्य अतिथी हजर होते.
प्रधानमंत्री आवास योजनेत रामटेक तालुक्याची निवड ही अतिशय पारदर्शक पणे ऑनलाईन रिपोर्टींग व प्रत्येक्षात केलेली वस्तुस्थिती दर्शक कामाच्या आधारावर केल्या गेली. खरंच काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी निस्पक्षपणे मा. योगेश कुंभेजकर सि.ई.ओ.आणि विवेक इलमे.पी.डी.यांनी रामटेक तालुक्याची निवड केल्याबद्दल व वेळोवेळी आम्हाला कामे करण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल प्रदीप बमनोटे बी.डी.ओ. रामटेक यांनी त्यांच्या स्नेहपूर्वक मार्गदर्शनासाठी आभार वेक्त केले.
मागील सतत दोन वर्ष रामटेक तालुका प्रथम क्रमांक वर राहिला व भविष्यातही सुद्धा हीच परंपरा कायम ठेवू असा निर्धार सर्व संबंधितांनी या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …