*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी कल्याणसिंह यांना दिली श्रद्धांजलि*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – श्री राम जन्मभूमि साठी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे श्रीराम रामभक्त , उत्तरप्रदेश चे माजी मुख्यमंत्री व राजस्थान चे माजी राज्यपाल स्वर्ग श्री कल्याणसिंह यांचे शनिवार २१ आॅगस्ट ला अल्प आजाराने दु:खद निधन झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री कल्याणसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित वाहुण श्रद्धांजलि अर्पित केली .
स्वर्ग श्री कल्याणसिंह यांची प्रकृती मागील काही दिवसान पासुन सतत चिंताजनक होत असल्याने त्यांना लखनऊ च्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज मध्ये भर्ती केले असुन उपचार सुरु होते . परंतु कल्याण सिंह यांचे शनिवार २१ आॅगस्ट ला रात्री च्या सुमारास दु:खद निधन झाल्याने संपुर्ण देशात , राजकीय क्षेत्रात शोक ची लहर पसरल्याने सोमवार दिनांक २३ आॅगस्ट ला गहुहिवरा चौक कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या उपस्थिती मध्ये स्वर्ग श्री कल्याणसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी कल्याणसिंह यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्ग श्री कल्याणसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन कल्याणसिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अतुल हजारे,भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी महामंत्री रामभाऊ दिवटे,कन्हान शहर भाजपा अध्यक्ष मनोहर पाठक,सुनील लाडेकर,राजेश शेन्द्रे,अजय लोंढे,शिवाजी चकोले,कामेश्वर शर्मा,दीपचंद शेंडे,शैलेश शेळके,सौरभ पोटभरे,मयूर माटे,सचिन वासनिक,अमोल साकोरे,दिनेश नानवटकर,ऋषभ बावनकर,स्वाती पाठक,सुषमा मस्के,तुलेषा नानवटकर,समर्थना देशभ्रतार,संजय रंगारी,अमन घोडेस्वार,चंद्रकांत बावने, सुरेश देवांगन,रिदम शेंडे , राजेश पोटभरे सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज