Breaking News

*आंगणवाडी येथुन वजन काटा चोरुन नेणाऱ्या आरोपींना वजन काटया सह पकडले* *कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन वजन काटा केला जप्त*

*आंगणवाडी येथुन वजन काटा चोरुन नेणाऱ्या आरोपींना वजन काटया सह पकडले*

*कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन वजन काटा केला जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन नगर परिषद इमारत च्या बाजुला असलेल्या आंगणवाड़ी क्रमांक.१४५ येथे दोन आरोपी ने आंगणवाड़ी मध्ये असलेला वजन काटा चोरुन नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपीचा शोध घेत असता गुप्त माहिती वरुन दोन्ही आरोपी ला पकडुन त्याचा जवळुन वजन काटा जप्त करून ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक १९ ऑगस्ट २०२१ चे दुपारी ३:३० वाजता ते शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट २०२१ चे सकाळी ९:३० वाजता दरम्यान फिर्यादी आंगणवाडी सेविका मनिषा नरेंन्द्र बेले वय ४५ वर्ष राहणार रामनगर कन्हान यांनी नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या नवीन इमारत च्या बाजुला असलेल्या आंगणवाड़ी क्रमांक. १४५ च्या खोलीचे दरवाजा उघडायला गेल्या असता कुलुप दिसुन न आल्याने खोलीच्या आत प्रवेश करून पाहणी केली असता खोलीमध्ये असलेला वजन काटा किंमत ६,६०० रुपये कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी सदर चोरी चा शोध घेत असतांना गोपनीय माहिती वरून आरोपी अमोल संतोष मारबते वय ३० वर्ष राहणार पटेल नगर कन्हान व एक विधीसंघर्षीत बालक यांना २४ तासाचा आत ताब्यात घेऊन त्यांचा ताब्यातुन चोरी केलेला वजन काटा हस्तगत करण्यात आला. कन्हान पोलीसांनी सदर प्रकरणी फिर्यादी आंगणवाडी सेविका यांचे तक्रारीने आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक. ३१६ /२०२१ कलम ४५७ , ३८० , ४११ भादवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोहवा खुशाल रामटेके, नापोशि मंगेश ढबाले , पोशि सुधीर चव्हाण, शरद गिते, जितेंद्र गावंडे आदी ने कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …