Breaking News

*राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता पखवाडा अभियान*

*राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता पखवाडा अभियान*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- श्री सच्चिदानंद शिक्षण संस्था द्वारा संचालित तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी , तायवाडे इन्स्टिटयूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी – महादूला कोराडी तसेच घोगली ग्रामपंचायत , घोगली यांच्या संयुक्त विद्यमाने घोगली या गावात दोन दिवसीय कार्यक्रम राबविण्यात आला . या गावात दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये मास्क , सॅनिटायझर व महिलांकरिता सॅनिटरी नॅपकिन , वृक्षारोपण त्याप्रमाणे स्वच्छता पखवाडा अंतर्गत स्वच्छता अभियान दिनांक १३/०८/२०२१ व १४/०८/२०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व महिला निवारण कक्षातर्फे आयोजित करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्या करीत घोगली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ . कल्पना वानखेडे , माजी सरपंच राजेंद्र वानखेडे तसेच तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ . चंद्रशेखर डोईफोडे व तायवाडे इन्स्टिटयूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी चे प्राचार्य श्री . विक्रांत चिलाटे त्याच प्रमाणे राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कमलेश माचेवार व महिला तक्रार निवारण कक्ष चे प्रा . दीपिका कलोडे , प्रा . अभिजित दरवाडे प्रा. प्रीती ठाकरे प्रा. प्रिया ठाकरे प्रा. हर्षा राऊत उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष हसोरिया , रुपाली मगरडे , मोहनीश जुनघरे , निकिता साधवानी , गायत्री तांबुलकर , तन्वी इंगोले , लोकेश गौतम या सोबत जवळ जवळ ४० विधार्थी व ५० गावातील नागरिक उपस्थित होते . या कार्यक्रमात मास्क , सॅनिटायझर व सॅनिटरी नॅपकिन , गावात घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …