Breaking News

*बीडीओ प्रदीप बमनोटे यांना आकाशझेप तर्फे जीवन गौरव सन्मान*

*बीडीओ प्रदीप बमनोटे यांना आकाशझेप तर्फे जीवन गौरव सन्मान*

 

रामटेक प्रतिनिधी : पंकज चौधरी

रामटेक – महाराष्ट्र शासन द्वारा वर्ष २०२०-२१ या कालावधीत संपूर्ण राज्यात महा आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वप्नातील हक्काचे घर त्यांना उपलब्ध करून देण्यात रामटेक पंचायत समितीने प्रथम क्रमांकाचे दोन बक्षीस पटकावल्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय पर्वावर बीडीओ प्रदीप बमनोटे यांना सन्मानित करण्यात आले होते.


मागील दोन वर्षाच्या कालावधीत बीडीओ बमनोटे यांच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवून शासकीय सेवांचा लाभ दिला जात आहे. एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रामटेक तालुक्यात गट विकास अधिकारी बमनोटे यांच्याबद्दल जनमानसात विश्वासाचे स्थान आहे. आकाशझेप फाऊंडेशनचे मार्गदर्शक या नात्याने देखील समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या पार्श्वभूमीवर आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान तर्फे २३ ऑगस्टला पंचायत समिती कार्यालयात बीडीओ बमनोटे यांना ‘जीवन गौरव सन्मान’ स्वरूप शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, आकाशझेपचे उपाध्यक्ष प्रा. श्रीकांत येरपुडे, संचालक वैभव तुरक व शैलेश वाढई, सदस्या सुषमा गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …